AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | शिल्पा शेट्टी, राज कुंद्रासह काशिफ खानवर गुन्हा दाखल

| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 10:24 PM
Share

नितीन बरई नावाच्या व्यक्तीने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा एफआयआर दाखल केला आहे. नितीन बरई यांनी पोलिस तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शिल्पा आणि राज यांच्यावर 1.51 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : बॉलिवूडची टॉप अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसून येत नाहीय. पॉर्न प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्रा आता फसवणुकीच्या प्रकरणात अडकला  आहे. या प्रकरणी शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नितीन बरई नावाच्या व्यक्तीने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा एफआयआर दाखल केला आहे. नितीन बरई यांनी पोलिस तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शिल्पा आणि राज यांच्यावर 1.51 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2014-2015 मध्ये फिटनेस कंपनीच्या माध्यमातून 1.51 कोटींची फसवणूक केल्याचे नितीन बोरई यांचं म्हणणं आहे.

Follow Us