Keralam Election Results 2026 | केरळमध्ये यूडीएफ आघाडीची आघाडी; केरळमच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमधून तीन नावांची चर्चा
देशातील महत्त्वाच्या पाच राज्यांतील—पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळम आणि पुद्दुचेरी—विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, एकूण 824 जागांसाठी निकाल जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून टपाली मतपत्रिकांची मोजणी पूर्ण करून आता ईव्हीएममधील मतमोजणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशभराचे लक्ष निकालांकडे लागले आहे.

दरम्यान, केरळंममधून महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडी सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमधील संभाव्य चेहऱ्यांबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर रमेश चेन्निथला, व्ही. डी. सतीशन आणि के. सी. वेणुगोपाल यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. अंतिम निकाल स्पष्ट झाल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित होणार असला, तरी सध्याच्या घडामोडींमुळे केरळच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.
एकूणच, पाचही राज्यांतील मतमोजणीमुळे देशाच्या राजकीय चित्रात मोठे बदल होण्याची शक्यता असून, पुढील काही तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
Published on: May 04, 2026 12:36 PM
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम