किरण मगरची प्रो-कबड्डीसाठी निवड! दत्तात्रय भरणेंकडून सत्कार

नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डीच्या 9 व्या पर्वातील सामन्याच्या लिलाव प्रक्रियेत यू मुंबा संघाने किरणसाठी 31 लाखांची बोली लावून आपल्या संघामध्ये त्याचे स्थान निश्चित केले आहे.

रचना भोंडवे

|

Aug 12, 2022 | 8:08 PM

वालचंदनगर: इंदापूर तालुक्यातील कळंब येथील किरण लक्ष्मण मगर (Kiran Magar) या तरुणाची प्रो-कबड्डी च्या पर्व -9 साठी यू मुंबा संघामध्ये निवड झाली आहे. किरण याच्यासाठी यू मुंबा संघाने 31 लाखांची बोली लावली होती. किरण याला लहानपणापासूनच कबड्डीची आवड आहे, त्याने आजवर बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य व देशपातळीवरील कबड्डी स्पर्धेमध्ये यशस्वी खेळी केली आहे. त्याने 19 वर्षांखालील व खुल्या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर यश मिळविले असून, कळंबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डीच्या (Pro Kabaddi) 9 व्या पर्वातील सामन्याच्या लिलाव प्रक्रियेत यू मुंबा संघाने किरणसाठी 31 लाखांची बोली लावून आपल्या संघामध्ये त्याचे स्थान निश्चित केले आहे. किरण यांच्या या यशाने कळंब पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा आनंद झाला आहे. दरम्यान किरणचा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें