Kirit Somaiya | आनंदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑपरेटिव्ह बँक बुडवली: किरीट सोमय्या

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जोरदार टोला लगावलाय. ईडीने अडसूळ यांना अनेक समन्स पाठवले, पण ते जात नाहीत. अटक होताच आजारी पडले, असा टोला लगावतानाच त्यांनी अडसूळ आणि हसन मुश्रीफांनाही जोरदार टोला लगावला आहे.  

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली. त्यानंतर त्यांना गोरेगावच्या लाईफ केअर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जोरदार टोला लगावलाय. ईडीने अडसूळ यांना अनेक समन्स पाठवले, पण ते जात नाहीत. अटक होताच आजारी पडले, असा टोला लगावतानाच त्यांनी अडसूळ आणि हसन मुश्रीफांनाही जोरदार टोला लगावला आहे.

सीटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कोट्यवधी रुपये अजकले आहेत. त्याबाबत अडसूळ आणि उद्धव ठाकरे कुणीच उत्तर देत नाही. अडसूळ पिता-पूत्र यांनी कोट्यवधी रुपये खासगी खात्यात वळवले. बाप-बेटे मजा मारत आहेत. कर्नाळा बँक प्रकरणातही कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी ईडीला कारवाई करावी लागली. त्याचं मी स्वागत करतो, अशा शब्दात अडसूळांवरील कारवाईचं सोमय्या यांनी स्वागत केलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI