Special Report | Wine विक्रीचा वाद थेट नेत्यांच्या मुला-बाळांपर्यत ! -tv9
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही वाईन विक्रीच्या निर्णयाचं स्वागत करताना वाईन म्हणजे दारू नसल्याचं म्हटलं होतं. राऊत यांच्या या दाव्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट राऊतांवरच हल्ला केला आहे.
मुंबई: महाविकास आघाडीने राज्यातील सुपर मॉल आणि किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. त्याला भाजपने कडाडून विरोध केला आहे, तर आघाडीने मात्र त्याचं समर्थन केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही वाईन विक्रीच्या निर्णयाचं स्वागत करताना वाईन म्हणजे दारू नसल्याचं म्हटलं होतं. राऊत यांच्या या दाव्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट राऊतांवरच हल्ला केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक आहे. वाईनचा व्यवसाय करणाऱ्या एका बड्या उद्योगासोबत संजय राऊत यांची पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच राऊतांनी आपले आरोप खोडून दाखवावेच असं आव्हानही त्यांनी दिलं आहे. सोमय्या यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात वाईन म्हणजे दारू नव्हे. मग वाईन म्हणजे काय आहे? राऊत साहेब वाईन म्हणजे काय आहे? आपला आणि वाईनचा संबंध काय? किरीट सोमय्यांचा आणि वाईनचा दमडीचाही संबंध नाही. मी आयुष्यात कधी अंडी खाल्ली नाही. बिडीही ओढली नाही. सिगारेट नाही. वाईन नाही आणि बियरही नाही. तुमचा संबंध काय आहे. संजय राऊत कुटुंबाने काही महिन्यापूर्वी वाईन व्यवसायातील मोठ्या उद्योगपतीशी बिझनेस पार्टनरशीप सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंच्या सर्व सहयोगी आणि ठाकरे सरकारचे कारनामे फक्त न् फक्त पैसे गोळा करणं आहे. महाराष्ट्राला मद्य राष्ट्र बनवायला निघाले आहेत. राऊतांनी सांगावं किती महिन्यांपूर्वी तुम्ही मॅगपी ग्रुप अशोक गर्ग यांच्या बरोबर तुम्ही बिझनेस पार्टनरशीप केली. राऊतांनी सांगावं त्यांची पत्नी आणि कन्या किती व्यवसायात ऑफिशियल पार्टनर आहे. किती व्यवसायात जॉईंट व्हेंचर केलं आहे, असं आव्हानच किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

