संजय राऊत हाणा मला, सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांचं जोरदार खंडन केलं. अलिबागजवळील कोरलाई गावात ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले आपल्या नावावर केले असल्याची तक्रार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केली होती.
नवी दिल्ली : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांचं जोरदार खंडन केलं. अलिबागजवळील कोरलाई गावात ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले आपल्या नावावर केले असल्याची तक्रार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केली होती. त्याविरोधात पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी काल ठाकरे कुटुंबाचा आणि बंगल्यांचा काही संबंध आहे, ही बाब नाकारली होती. अलिबागमधील (Alibagh Bungalow) ती बेनामी प्रॉपर्टी असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. असे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना जोड्यानं मारू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. या आरोपांना उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत मोठा हंगामा केला. मला जोड्याने मारू म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे पुरावे पहावे, तपासाने आणि मग हवं असेल तर मला जोड्यानं मारावं, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतच पायातले जोडे काढले
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

