Kolhapur Petrol Shortage Issue | कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर गेल्या दोन दिवसांपासून वाहनधारकांची मोठी रांग दिसत होती. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर निर्बंध लादले आहेत. टु-व्हीलरसाठी दररोज 200 रुपये एवढा पेट्रोल तर फोर-व्हीलरसाठी 2000 रुपये एवढा पेट्रोलचाच पुरवठा प्रत्येक ग्राहकाला करण्यात येणार आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर गेल्या दोन दिवसांपासून वाहनधारकांची मोठी रांग दिसत होती. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर निर्बंध लादले आहेत. टु-व्हीलरसाठी दररोज 200 रुपये एवढा पेट्रोल तर फोर-व्हीलरसाठी 2000 रुपये एवढा पेट्रोलचाच पुरवठा प्रत्येक ग्राहकाला करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, आता पेट्रोल पंपांवरील रांगा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. यापूर्वी वाहनधारक टाकी पूर्ण भरून घेण्यावर अधिक भर देत असल्यामुळे वेळेआधीच पेट्रोल संपत असे आणि काही वेळा सर्व पेट्रोल पंप बंद ठेवावे लागत होते. या निर्बंधांमुळे पेट्रोल विक्री अधिक नियमनात झाली असून, वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने पेट्रोल पंपांवरील गर्दी कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Published on: Mar 26, 2026 02:18 PM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

