Kolhapur Rain : जोतीबाच्या डोंगरावरील गुलाल अवकाली पावसानं धुऊन काढला! पाहा व्हिडीओ

जोतीबा देवाची चैत्र यात्रा नुकतीच झाली. त्यामुळे मंदिर परिसरात मोठा प्रमाणात गुलाल उधळण्यात आला होता.

भूषण पाटील

| Edited By: सिद्धेश सावंत

Apr 29, 2022 | 8:54 AM

गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Rain) अनेक भागाला अवकाळी पावसाने झोडपलं. दख्खनचा राजा जोतीबाच्या डोंगरावरही (Jotiba Dongar) जोरदार पाऊस झाला. जोतीबा देवाची चैत्र यात्रा नुकतीच झाली. त्यामुळे मंदिर परिसरात मोठा प्रमाणात गुलाल उधळण्यात आला होता. त्यावर पाऊस पडल्याने जोतिबा डोंगरावर सर्वत्र गुलाबी पाणी वाहत होतं. हे पाणी स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये (Mobile Video) चित्रीत केलंय. मुसळधार पावसाच्या हजेरीनं कोल्हापुरातील वातावरणात काहीसा गारवाही जाणवत होता. दरम्यान, वाढलेल्या तापमानात अवकाळी पावसाच्या हजेरीनं नागरीकांना काहीसा दिलासा दिलाय. मात्र या पावसानं शेतमालाचं नुकसान होण्याचीही भीती आहेच.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें