Konkan Railway वाहतूक ठप्प, कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
मात्र वेगळं इंजिन लावून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. तीन तासांच्या खोळंब्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री निघालेली कोकण कन्या गोव्यापासून जवळपास अडीचशे किलोमीटर अंतरावर बंद पडली होती.
मुंबई : कोकण रेल्वेची (Konkan Railway) विस्कळीत झालेली वाहतूक अखेर पूर्वपदावर आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारासच कोकण रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मुंबईहून निघालेल्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या (Konkarn Kanya Express) इंजिनमध्ये बिघाड झाला होता. मात्र वेगळं इंजिन लावून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. तीन तासांच्या खोळंब्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री निघालेली कोकण कन्या गोव्यापासून जवळपास अडीचशे किलोमीटर अंतरावर बंद पडली होती. अनेक गाड्यांचं वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
Published on: May 15, 2022 10:04 AM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
