Ladki Bahin Yojana : यांना कसली कडकी या झाल्या सरकारची ‘लाडकी’, सरकारी महिलांचा हावरटपणा, पगारासोबत 1500 वर डोळा
गोरगरिब महिलांना लक्षात घेऊन सुरू केलेली सरकारची महत्त्वकांक्षी योजना लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. आता तर या योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी महिलाच घेत असल्याचे समोर आले आहे.
महायुती सरकारने सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना गेल्या कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. आधी लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यासाठी आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचा आरोप आणि आता लाभ घेत असणाऱ्या २ हजार ६५२ सरकारी महिला कर्मचाऱ्यांची चर्चा होतेय. राज्यात नवीन सरकार येण्यापूर्वीच सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाखो महिलांनी अर्ज केला होता. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर अनेक महिला अपात्र असतानाही अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांचे अर्ज बाद झाले. तर आता धक्कादायक म्हणजे या योजनेचा लाभ राज्य सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांनीच घेतल्याच्या तक्रारी आल्या होत्या. १ लाख ६० हजार ५५९ महिला पुरूष कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी २ हजार ६५२ सरकारी महिलांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे समोर आले आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

