AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी

मोठी बातमी! लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी

| Updated on: Jun 02, 2026 | 5:28 PM
Share

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून योजनेतील लाखो लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळल्याची चर्चा सुरू असताना, सरकारकडून याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या लाभार्थींनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्या लाभार्थ्यांची पात्रता निकषांनुसार पडताळणी होणे आवश्यक आहे. ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे 60 ते 80 लाखांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. अशा लाभार्थ्यांना योजनेचा पुढील लाभ दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, यापूर्वी लाभ घेतलेल्या आणि नंतर अपात्र ठरलेल्या महिलांकडून शासन कोणतीही रक्कम वसूल करणार नसल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. दुसरीकडे, पडताळणीत पुरुष लाभार्थी असल्याचे आढळलेल्या सुमारे 14 हजार प्रकरणांमध्ये संबंधितांकडून लाभाची रक्कम परत वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. अशा पात्र महिलांना पुन्हा संधी देण्यासाठी सरकार सकारात्मक असून, लवकरच ई-केवायसीसाठी स्वतंत्र विंडो पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जात आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या आणि ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ सुरू ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी संख्या, ई-केवायसी प्रक्रिया आणि पात्रता पडताळणीवरून राज्यातील राजकारण तापले असून, सरकारच्या या निर्णयाकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 02, 2026 05:27 PM

Follow Us