Latur News : रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिला अमित देशमुखांच्या नावाचा दम, नंतर जे झालं ते..
विनापरवाना रिक्षा चालवत असल्याने वाहतूक पोलिसांनी रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना अमित देशमुखांच्या नावाचा दम दिल्याची घटना लातूर मधून समोर आली आहे.
लातूरच्या गंजगोलाई या बाजारपेठेत लायसन्स नसताना रिक्षा चालवत असल्याचा वाहतूक पोलिसांनी रोखल्यावर या रिक्षा चालकाने शक्कल लढवत मित्राला फोन लाऊन दिला. यावेळी मी बाभळगांव येथून बोलत असल्याचं या मित्राने सांगितलं. बाभळगांव हे अमित देशमुख यांचं गांव आहे, त्यामुळे पोलीस आपल्या मित्राला सोडून देतील असं या बहाद्दराला वाटलं. मात्र यावेळी पोलीस अधिकाऱ्याने समोरच्याची चांगलीच खरडपट्टी काढली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे.
Published on: Apr 20, 2025 05:01 PM
Latest Videos
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

