AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटलांना बळीचा बकरा केलं...भाजपच्या माजी मंत्र्याचा हल्लाबोल

जयंत पाटलांना बळीचा बकरा केलं…भाजपच्या माजी मंत्र्याचा हल्लाबोल

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Jul 11, 2024 | 2:44 PM
Share

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. भाजपचे पाच उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, भाजपची नेमकी रणनिती काय आहे? याबद्दल भाजपचे आमदार, माजी मंत्री संजय कुटे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

विधानपरिषदेची निवडणूक उद्या होणार आहे. त्यापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. भाजपचे पाच उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, भाजपची नेमकी रणनिती काय आहे? याबद्दल भाजपचे आमदार, माजी मंत्री संजय कुटे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमदारांना काही कारणास्तव हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. ही विधानपरिषदेची निवडणुकीची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे चांगले आमदारही गोंधळतात. थोडीशी जरी चूक झाली तरी एक मत वाया जातं. एक मत वाया जाणं हे खूप कठीण असतं. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवून नीट मार्गदर्शन केले जाते.’, असं संजय कुटे यांनी सांगितले. तर भाजपचे नाहीतर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, याबद्दल काही शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर रोहित पवारांवर आमदारांचा विश्वास नव्हता म्हणून ते अजितदादांकडे गेले तर जयंत पाटलांना बळीचा बकरा गेला आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Published on: Jul 11, 2024 02:39 PM

Follow Us