पक्षश्रेष्ठींनी विश्वास टाकला त्यामुळे सर्वांचे आभार मानतो – बावनकुळे
विधान परिषद निवडणुकीच्या 5 जागांसाठी काल भाजपनं उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या 5 जागांसाठी काल भाजपनं उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर बावनकुळे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, बावनकुळे पक्षाचा प्रत्येक कार्यक्रमात जोमाने काम करत राहिले. अनेक आंदोलनांचं नेतृत्वही बावनकुळेंनी केलं. त्यानंतर आता विधान परिषदेसाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना पक्षाचे आभार मानले, तसंच पुन्हा विधिमंडळात जोमाने काम करण्याचा विश्वास व्यक्त केलाय
Published on: Nov 20, 2021 12:47 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

