AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawab Malik | भाजपविरोधात तिसरी आघाडी तयार करू, नवाब मलिकांचा इशारा

Nawab Malik | भाजपविरोधात तिसरी आघाडी तयार करू, नवाब मलिकांचा इशारा

| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 7:16 PM
Share

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी साडेतीन तास चर्चा केली. त्यामुळे या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी साडेतीन तास चर्चा केली. त्यामुळे या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली, असं मलिक यांनी सांगितलं.

सशक्त आघाडी निर्माण करणार

देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची पवारांची इच्छा आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु, ते देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.