Ulhasnagar | उल्हासनगरात तीन पीठांच्या शंकराचार्यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना जीवनगौरव

उल्हासनगरात सोमवारी तीन पीठांच्या शंकराचार्यांचं आगमन झालं. ज्यामध्ये काशी पीठ, सुमेरू मठ आणि करवीर पिठाच्या शंकराचार्यांचा समावेश होता. उल्हासनगरच्या लायन्स क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात या तिघांच्या हस्ते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

उल्हासनगरात सोमवारी तीन पीठांच्या शंकराचार्यांचं आगमन झालं. ज्यामध्ये काशी पीठ, सुमेरू मठ आणि करवीर पिठाच्या शंकराचार्यांचा समावेश होता. उल्हासनगरच्या लायन्स क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात या तिघांच्या हस्ते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून समस्त शिवसैनिकांचा असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. कोरोना काळात शिवसेनेनं ठाणे जिल्ह्यात जे कार्य केलं, त्याची माहिती सुद्धा शिंदे यांनी शंकराचार्यांना दिली. तर यावेळी प्रत्येक शिवसैनिक हा साक्षात शिवाचा सैनिक असल्याचं मत काशी पिठाच्या शंकराचार्यांनी व्यक्त करत शिवसेनेच्या कार्याचं कौतुक केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI