AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Taliye Landslide | महाडमधल्या तळीये गावात दुर्घटना, घटनेला 18 तास उलटले, आणखी मदत नाही, स्थानिकांचा आक्रोश

Raigad Taliye Landslide | महाडमधल्या तळीये गावात दुर्घटना, घटनेला 18 तास उलटले, आणखी मदत नाही, स्थानिकांचा आक्रोश

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 3:01 PM
Share

रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून (Raigad Landslide) तब्बल 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून (Raigad Landslide) तब्बल 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात (Taliye Village) ही भीषण दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.

प्रशासन मदतीला पोहोचलंच नाही, स्थानिकांचा संताप

दरम्यान, इतके तास होऊनही राज्य सरकारची आवश्यक ती मदत आणखी पोहोचलेली नाही. आम्ही स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढले. पण आम्हालाही सीमा आहे. शासनाच्या मदतीविषयी आम्ही संपूर्ण बचाव कार्य कसं करणार? असा सवाल करत शासनाने लवकरात लवकर मदत पोहोचवावी, अशी याचना इथेल नागरिक करताना दिसून येत आहेत. (Local people Comment on Mahad Taliye Landslide Killed 32 people )

Published on: Jul 23, 2021 02:49 PM