Solapur | सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात संचारबंदी
सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात आजपासून पुढील आदेश येइपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोना कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा संध्याकाळी चारपर्यंत सुरु राहणार आहेत. तर बिगर अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद असणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात आजपासून पुढील आदेश येइपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोना कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा संध्याकाळी चारपर्यंत सुरु राहणार आहेत. तर बिगर अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रम पूर्ण पणे बंद असणार आहेत. विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी आहे. खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरु राहणार आहे.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

