Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole : सरकार स्थापन करण्याच्या NDA vs INDIA आघाडीच्या रस्सीखेचमध्ये काँग्रेसचा मोठा दावा, फॉर्म्युला तयार

Nana Patole : सरकार स्थापन करण्याच्या NDA vs INDIA आघाडीच्या रस्सीखेचमध्ये काँग्रेसचा मोठा दावा, फॉर्म्युला तयार

| Updated on: Jun 05, 2024 | 5:17 PM

भाजपाप्रणित एनडीएने २९२ जागांवर विजय मिळवला. भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. केंद्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा २७२ आहे. त्यामुळे एनडीएकडून सत्ता स्थापन केली जाऊ शकते अशी शक्यता असताना काँग्रेसकडून मोठा दावा

लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या निकालात भाजपाप्रणित एनडीएने २९२ जागांवर विजय मिळवला. भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. केंद्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा २७२ आहे. त्यामुळे एनडीएकडून सत्ता स्थापन केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविली जात असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे. केंद्रात सरकार स्थापन करण्यास आमचा फॉर्म्युला तयार असल्याचं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. ‘आम्ही देशातील सर्वात मोठा पक्ष आहोत. आम्हीही सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार आहे. आमच्याकडे सर्व फॉर्म्युले तयार आहेत. सगळे खासदारांना दिल्लीत बोलावलं आहे. दिल्लीत सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Published on: Jun 05, 2024 05:17 PM