Loksabha Election Exit Poll 2024 : महाराष्ट्रात कोणत्या जागांवर कोण हिरो? कोणाच्या पारड्यात कोणती जागा? एक्झिट पोलचा अंदाज काय?
देशात आज सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच अनेक राजकीय विश्लेषकांनी आपले आपले अंदाज वर्तविले तर काही एक्झिट पोलही समोर आले आहेत. राज्यातील 48 मतदारसंघांमध्ये विजयाची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार कोणते बघा....
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही दिवस बाकी असताना निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात तर महायुतीला 22 जागा तर महाविकास आघाडीला सर्वाधिक 25 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. यासोबतच या निवडणुकीत ठाकरे गटाला तब्बल 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा TV9 पोलस्ट्रेटच्या सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधून महाराष्ट्रात महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीचे घटकपक्ष भाजपला 18, शिंदे गटाला 4, अजितदादा गटाला 0 तर महाविकास आघाडीमधील पक्ष कॉंग्रेस 5, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) 6 आणि ठाकरे गटाला 14 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 48 मतदारसंघांमध्ये विजयाची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार कोणते बघा….
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात

