AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हाला मंत्रिपद हवं, अन्यथा..., महादेव जानकर यांचा भाजपला गंभीर इशारा

“आम्हाला मंत्रिपद हवं, अन्यथा…”, महादेव जानकर यांचा भाजपला गंभीर इशारा

apeksha sakpal
apeksha sakpal | Updated on: Jun 27, 2023 | 9:00 AM
Share

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून रखडलेला आहे. मात्र या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यात आता रासप पक्षाचे महादेव जानकर यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावं, असं म्हटलं आहे.

नाशिक : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून रखडलेला आहे. मात्र या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यात आता रासप पक्षाचे महादेव जानकर यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावं, असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “आम्ही एनडीए मध्ये आहोत. पण आम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही. मी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवतो. आम्ही म्हणतो एनडीएमध्ये आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. ज्यावेळी माझे 50 आमदार असतील, त्यावेळी मी बोलेल. मी इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मी प्रॅक्टिकल वागतो. आम्ही भाजपसोबत आहे. आम्हाला विधानसभेला, लोकसभेला जागा मिळाली नाही. आम्ही बंडखोरी करून शेवटी आमचा आमदार निवडून आणला. भाजपला मित्र पक्षाची गरज आहे.पण त्यांनी मित्र पक्षाची वाट लावली आहे. आमची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे. आम्ही भाजपला म्हणणार नाही, आम्हाला काही द्या म्हणून. त्यांनी आम्हाला जागा द्याव्यात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद हवं. आमचं हेलिकॉप्टर जर लॅन्ड झालं तर, आम्ही आमची ताकद दाखवून देऊ,” असं त्यांनी म्हटलं.

Published on: Jun 27, 2023 09:00 AM

Follow Us
Sanjay Raut : एकनाथ शिंदे-जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चांना उधाण, राऊत म्हणाले – उद्या जर ते आठवलेंना….

Sanjay Raut : एकनाथ शिंदे-जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चांना उधाण, राऊत म्हणाले – उद्या जर ते आठवलेंना…

मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ.

मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ

घर दाखवते म्हणत जाळ्यात ओढलं, नको ते फोटो काढून… रीलस्टारच्या कांडामुळे महाराष्ट्र हादरला.

घर दाखवते म्हणत जाळ्यात ओढलं, नको ते फोटो काढून… रीलस्टारच्या कांडामुळे महाराष्ट्र हादरला

सिया बाहेर आली आणि त्याच रुममध्ये दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन, हादरवणारे हॉटेल कांड, केतन अग्रवाल प्रकरणात...

सिया बाहेर आली आणि त्याच रुममध्ये दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन, हादरवणारे हॉटेल कांड, केतन अग्रवाल प्रकरणात..

हायकोर्टाने महापौरांना फटकारले, नवीन पाणी पुरवठा योजनेवरून सुनावले, सुनावणीदरम्यान घडलं काय?.

हायकोर्टाने महापौरांना फटकारले, नवीन पाणी पुरवठा योजनेवरून सुनावले, सुनावणीदरम्यान घडलं काय?

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक...

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..