Gotya Gitte Video : गोट्या गित्तेचा आणखी एक VIDEO समोर, आता थेट माजी आमदारासोबत जेवणाचा आस्वाद अन्…
बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्तेचा आष्टी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या सोबत जेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्तेचे गेल्या काही दिवसांपासून नव नवे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. नुकताच विधानसभा निवडणुकीत गोटया गित्ते याने ईव्हीएम मशीनवर मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकीकडे आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा भंग म्हणून सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल केले जातात मात्र गोट्या गित्तेसाठी परळीत वेगळा नियम आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. अशातच आज महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असणाऱ्या या गोट्या गित्तेचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गोट्या गित्ते हा एका माजी आमदारासोबत जेवणाचा आस्वाद घेताना दिसतोय. व्हायरल व्हिडीओमध्ये असणारे माजी आमदार हे बीडच्या आष्टीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे असल्याचे सांगितले जात आहे.
राजकीय लोकांसोबत रील काढायच्या आणि सोशल मध्यमांवर व्हायरल करून दहशत कायम ठेवायची हा गोट्याचा धंदा. असं असलं तरी मात्र तो धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचा राईट हॅन्ड म्हणून त्याची आजही ओळख आहे. गोट्या विरोधात तब्बल 43 गुन्हे दाखल असल्याची माहिती आज सकाळीच समोर आली होती. गोट्याला पोलीस कधी अटक करणार? असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

