VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 January 2022

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा सामाजिक सुरक्षा विभाग सातत्याने या घटनांवर लक्ष ठेवून आहे. गेल्या सहा महिन्यापासून बेकायदेशीर रित्या विकल्या जाणाऱ्या गुटखा, गांज्या, अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. आतापर्यत सामाजिक सुरक्षा विभागाने लाखो रुपयांचा माल हस्तगत केला असून , अनेकांना अटकही केली आहे.

पुणे सोलापूर मार्गावर 46 लाखांचा गुटखा पकडल्याची घटना ताजी असताना आज पिंपरी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने तब्बल 2 लाख 95 हजार 699 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. चाकण मधील ठाकरवाडी येथे सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान धर्मराज चौधरी याला अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा सामाजिक सुरक्षा विभाग सातत्याने या घटनांवर लक्ष ठेवून आहे. गेल्या सहा महिन्यापासून बेकायदेशीर रित्या विकल्या जाणाऱ्या गुटखा, गांज्या, अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. आतापर्यत सामाजिक सुरक्षा विभागाने लाखो रुपयांचा माल हस्तगत केला असून , अनेकांना अटकही केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI