VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 17 July 2022
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेतील अनेक नेते कार्यकर्ते रोज शिंदे गटात सामील होत आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून शिंदे गटात जोरदार भरती सुरु आहे. बंड केलेले आमदार आपले शक्ती प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेतील अनेक नेते कार्यकर्ते रोज शिंदे गटात सामील होत आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून शिंदे गटात जोरदार भरती सुरु आहे. बंड केलेले आमदार आपले शक्ती प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण पालिकेची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. त्या निवडणुकीत फुटीचे नक्की पडसाद पाहायला मिळतील. काल रात्री उशिरा पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेविका यांचे पती दिवाकर सिंग, बविआतील काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले वसई विरार चे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह 50 शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झालेत.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

