MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 10 July 2021

शेतकऱ्यांच्या मदतीवरुन भाजप आमदार समिर कुणावर (BJP MLA Samir Kunawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 10, 2021 | 1:29 PM

शेतकऱ्यांच्या मदतीवरुन भाजप आमदार समिर कुणावर (BJP MLA Samir Kunawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत का?, असा सवाल करत शेतकऱ्यांना मदतीचा दिलेला शब्द पाळा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी समिर कुणावर यांनी केली आहे.

गेल्या हंगामात प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना मदत नाही, शासनाने पाऊल उचलावं

वर्धा जिल्ह्यातील हिॅगणघाटचे समिर कुणावार हे भाजपचे आमदार आहेत. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना तीन-तीन स्मरणपत्र देवूनंही गेल्या हंगामातील नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. कापूस, सोयाबीनच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झालाय. पण वर्ष लोटलं तरिही मुख्यमंत्री मदत देत नाही”, असं समिर कुणावर म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें