MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 22 October 2021
मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे.
मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका रहिवाश्याचा दुर्दैवाने या घटनेत मृत्यू झाला आहे.
करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. त्यावेळी आग लागल्याची माहिती समोर येत आहे. पण यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

