AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News : मुंबईतल्या पडघाचं दहशतवादी कनेक्शन; एटीएसकडून ठाण्यात छापेमारी

Mumbai News : मुंबईतल्या पडघाचं दहशतवादी कनेक्शन; एटीएसकडून ठाण्यात छापेमारी

| Updated on: Jun 02, 2025 | 11:41 AM
Share

ATS raids in Padgha Thane : महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने मुंबईत मोठी कारवाई करत पडघा येथील दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या साकीब नाचनच्या घरावर छापा मारला आहे.

महाराष्ट्र एटीएसकडून ठाण्यातल्या पडघा येथे छापेमारी करण्यात आली आहे. एटीएस पथकाकडून साकीब नाचनच्या घरावर छापा मारण्यात आलेला आहे. साकीबला यापूर्वी देखील 2 दहशतवादी प्रकरणात अटक करण्यात आलेली होती. यापूर्वी एनआयएनेसुद्धा पडघा येथे मोती छापेमारी करत अनेकांना अटक केलेली आहे. एटीएसने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे.

आज पहाटेपासूनच एटीएसच्या पथकाकडून पडघा गावातल्या दहशतवादाशी संबंध असलेल्या अनेकांच्या घरी छापेमारी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. साधारणत: दीड वर्षांपूर्वी देखील एनआयएने अशीच कारवाई करत दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्यांना , या अटक केली होती. त्यानंतर आज देखील मोठ्या प्रमाणात हे छापे मारले जात आहेत. दरम्यान, आता नेमकी काय आणखी नवी माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Published on: Jun 02, 2025 11:30 AM