AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार! बजेटकडे सर्वांचं लक्ष

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार! बजेटकडे सर्वांचं लक्ष

| Updated on: Mar 06, 2026 | 2:15 PM
Share

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून विकसित महाराष्ट्राचे व्हिजन 2047 स्पष्ट करण्यात आले. राज्याचा जीडीपी आणि थेट परकीय गुंतवणुकीत महत्त्वाचा वाटा, पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती तसेच विविध लोककल्याणकारी योजनांवर भर दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद भूषवताना कोणी अर्थसंकल्प सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी त्यांनी 2023-24 मध्येही अर्थसंकल्प मांडला होता.

या अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासाचे विविध पैलू समोर आले आहेत. देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे, तसेच थेट परकीय गुंतवणुकीत 31 टक्के वाट्यासह महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. रस्ते, मेट्रो, बंदरे, विमानतळे, औद्योगिक कॉरिडॉर आणि लॉजिस्टिक क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होत आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2025 पर्यंत 4 कोटी 9 लाख शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. यासोबतच, प्रधानमंत्री आवास योजना आणि जलजीवन अभियानामुळे नागरी व ग्रामीण भागांत मोठ्या संख्येने घरे पूर्ण झाली असून, कुटुंबांना नळजोडणी मिळाली आहे. स्टार्टअप्सच्या संख्येत महाराष्ट्र देशात 17 टक्के हिस्सा घेऊन आघाडीवर आहे.

Published on: Mar 06, 2026 02:15 PM
Follow Us