AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death in Plane Accident : भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू

Ajit Pawar Death in Plane Accident : भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू

| Updated on: Jan 28, 2026 | 10:06 AM
Share

Maharashtra Deputy CM Ajit Pawar's plane crash Death in Baramati LIVE Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला आहे. लँडिंगदरम्यान त्यांचे छोटे विमान कोसळून त्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण सहा जणांचा बळी गेल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. घटनेनंतर बारामती आणि परिसरातील नागरिक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते.

बारामतीत लँडिंगदरम्यान झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. हे छोटे विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले. या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण सहा जणांचा बळी गेल्याची माहिती डीजीसीएने (Directorate General of Civil Aviation) दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि विमानाला लागलेली आग विझवली. अपघातानंतर बारामती आणि आसपासच्या भागातील नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गर्दीला मागे जाण्यास सांगितले. अजित पवार एका सभेसाठी मुंबईहून बारामतीला निघाले होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

Published on: Jan 28, 2026 10:06 AM