रिफायनरीमुळे 5 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या, देवेंद्र फडणवीसांच महत्त्वाच विधान
"देशातली सगळ्यात मोठी रिफायनरी येणार होती. 3 लाख 50 हजार कोटीची गुंतवणूक म्हणजे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक होती"
मुंबई: “देशातली सगळ्यात मोठी रिफायनरी येणार होती. 3 लाख 50 हजार कोटीची गुंतवणूक म्हणजे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक होती. सगळ्या शासकीय इंधन कंपन्या आणि मिडल इस्टची कंपनी या प्रकल्पात गुंतवणूक करणार होती. या एका गुंतवणूकीमुळे 5 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. तुम्ही गुजरातच्या अर्थव्यवस्थेत बघितलं, तर गुजरातच्या अर्थव्यवस्थेत दोन गोष्टींचा मोठा वाटा आहे. जामनगर रिफायनरी आणि मुद्रा पोर्टचा वाटा आहे. या जामनगर रिफायनरीपेक्षा तीन-चार पट मोठी रिफायनरी महाराष्ट्रात आली असती, तर महाराष्ट्र पुढची 10 वर्ष इतर राज्यांपेक्षा पुढे गेला असता” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Published on: Sep 16, 2022 06:08 PM
Latest Videos
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

