Raosaheb Danve | केंद्र सरकार मदत करलेच, तोपर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर सध्या नुकसानग्रस्त भागातील पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ऊसासह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. आता शेतकरी सरकारकडे आस लावून बसला आहे. अशावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर सध्या नुकसानग्रस्त भागातील पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. इतकंच नाही तर दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच एका वक्तव्याची आठवण करुन दिली आहे.

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं आणि शेतजमिनीचं मोठं नुकसान झालं आहे. या भागातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी रावसाहेब दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत. त्यावेळी दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादेत असताना पंचनामे कशाचे करता, मदत जाहीर करा, अशी मागणी केली होती. आता नशिबाने उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी पंचनामे न करताना थेट शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI