Shiv Sena Symbol Hearing : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होतेय. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठासमोर सुनावणी होत आहे. या सुनावणी दरम्यान काय युक्तीवाद सुरू आहे? पाहा...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होतेय. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठासमोर सुनावणी होत आहे. यात हरिश साळवे आणि कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत. हरिश साळवे यांच्याकडून नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देण्यात आला आहे. यावर अरूणाचल प्रदेशमध्ये तेव्हाची परिस्थिती काय होती पाहावी लागेल. या प्रकरणात राज्यपालांची भूमिका काय होती हे पाहावं लागेल, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. विधानसभाअध्यक्षांऐवजी राज्यपालांनी अधिवेशन बोलावलं. सभागृहातील अधिकार बदलता येत नाहीत, असंही सिब्बल म्हणालेत.

