हिंदी सक्तीवरुन ठाकरेंची फडणवीसांकडून पोलखोल!
महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री असताना ठाकरेंच्या मंत्रिमंडळानेच हिंदी आणि इंग्रजीला द्वितीय भाषा म्हणून सक्तीची शिफारस स्वीकारल्याचे फडणवीसांनी पुराव्यासह दाखवले. त्यांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे श्रेयही घेतले. सध्या नरेंद्र जाधव समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्र विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, त्यांच्याच मंत्रिमंडळाने हिंदी आणि इंग्रजीला पहिली ते बारावीपर्यंत सक्तीची द्वितीय भाषा म्हणून स्वीकारल्याचा अहवाल मंजूर केला होता, असा दावा फडणवीसांनी केला. त्यांनी विधानसभेत ठाकरेंच्या सहीचा कागदच दाखवला.
यामुळे त्रिभाषा सूत्राचा जीआर काढण्यात आला, असे फडणवीस म्हणाले. हिंदी सक्तीच्या जीआरवर शिवसेनेच्या भास्कर जाधवांनी महायुती सरकारवर टीका केल्यानंतर फडणवीसांनी हा पलटवार केला. फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय असे निर्णय होत नाहीत. या वादामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत डॉ. नरेंद्र जाधव समिती नेमण्यात आली असून, तिचा अहवाल नुकताच सादर झाला आहे, परंतु अद्याप त्यावर मंत्रिमंडळात चर्चा झालेली नाही.
Published on: Feb 27, 2026 11:08 AM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
