Satara Rain : पावसाचा कहर, शेतात चिखलच चिखल… शेतकऱ्याचे पाय मातीत रुतले, शेतमाल बाहेर काढताना कसरत
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये रविवारी रात्री 25 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर शेतकऱ्यांच्या शेतपीकाचं मोठं नुकसान झालं आहे.
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे रस्ते जलमय झाले असून सखोल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच साताऱ्यातील कोरगावातही मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. यासह अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने चिखलाचं साम्राज्य दिसतंय. मुसळधार पावसाने शेती पाण्याखाली गेली असून शेत जमिनीवर पाणी साचल्याने चिखल झालाय. साताऱ्यातील नांदगिरी खेडमध्ये शेतात चिखल झाल्याने शेतमाल बाहरे काढताना शेतकऱ्याला मोठी कसरत करावी लागत आहे. डोक्यावर भिजलेला शेतमाल घेऊन जाताना गुडघाभर चिखलात शेतकऱ्याचे पाय रूतल्याचेही चित्र बघायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना शेतीचं काम करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

