School Reopen | शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सची बैठक

4 ऑक्टोबरला शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर आज शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सची ऑनलाईन बैठक होणार आहे.  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चु कडू, शिक्षण विभागाचे सचिव, टास्क फोर्सचे सदस्य  बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

4 ऑक्टोबरला शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर आज शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सची ऑनलाईन बैठक होणार आहे.  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चु कडू, शिक्षण विभागाचे सचिव, टास्क फोर्सचे सदस्य  बैठकीला उपस्थित राहणार आहेत.   आज दुपारी 4 वाजता ऑनलाईन बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीत शाळांंनी करावयाच्या उपाययोजनांबाबत टास्क फोर्स  मार्गदर्शन करणार आहे.  आजच्या बैठकीत चर्चा करून नियमावली ठरवण्यात येणार आहे. दूपारी शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामीण भागात आता 5 ते  12 वीचे वर्ग सुरु होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्यानंतर राज्यातील शाळा सुरु होत आहेत. तर, शहरी भागातील 8 वी  ते  12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा देखील 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत.

Published On - 1:06 pm, Fri, 1 October 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI