महिलेलाच महापौर करा… शिंदे गटाच्या महिला नेत्याची मागणी; भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
ठाकरेंच्या मक्तेदारीनंतर अखेर 25 वर्षांनी महायुतीचा महापौर बसणार आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी सांगितले. 25 वर्षांनी महायुतीला संधी दिल्याबद्दल शायना यांनी मुंबईकरांचे आभार मानले. मुंबईकरांनी एकनाथ शिंदे यांचा संघर्ष पाहिला आहे, म्हणूनच महायुतीला बहुमत दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आली असून, मुंबईचा महापौर नक्की कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरेंच्या मक्तेदारीनंतर अखेर 25 वर्षांनी महायुतीचा महापौर बसणार आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी सांगितले. 25 वर्षांनी महायुतीला संधी दिल्याबद्दल शायना यांनी मुंबईकरांचे आभार मानले. मुंबईकरांनी एकनाथ शिंदे यांचा संघर्ष पाहिला आहे, म्हणूनच महायुतीला बहुमत दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शायना यांनी सांगितले की, मराठी माणूस, मराठी माणूस करत विरोधकांनी फक्त निवडणुकीच्या काळात घोषणा केल्या, पण आमच्या नेत्यांनी प्रत्यक्षात विकासाचे कामे केली. गिरणी कामगारांसाठी, बीडीडी चाळीत सुधारणा, 17 हजार लोकांना घर देणे, तसेच अन्य सामाजिक प्रकल्प राबविणे यांसारख्या कामांमुळे मुंबईकरांना महायुतीचा नेमका चेहरा पसंतीस पडला.
शायना यांनी पुढे सांगितले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे एकमेव लक्ष म्हणजे विकसित मुंबई आणि विकसित महाराष्ट्र. त्यांनी महापौरपदासाठी मुंबईकरांनी योग्य निवड करावी आणि विकासाच्या अजेंड्याला प्राधान्य द्यावे, अशी विनंती केली.
मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असेल, असे काही ठिकाणी म्हटले जात आहे; मात्र शायना एनसी यांनी थेट प्रतिक्रिया देत सांगितले की, महापौर कोण असेल, तरी महिला महापौर असावा, अशी त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे.

