Mahim Election Result 2024 : माहिममध्ये अमित ठाकरे अन् सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे ते विजयाचा गुलाल उधणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र निकाल समोर येताच राज ठाकरे यांचे पुत्र यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबईतील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघ. माहिममध्ये ठाकरे गट शिवसेनेकडून महेश सावंत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि मनसेकडून अमित ठाकरे यांच्यात तिरंगी लढत यंदा रंगल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे ते विजयाचा गुलाल उधणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र निकाल समोर येताच राज ठाकरे यांचे पुत्र यांना मोठा धक्का बसला आहे. कारण माहिममध्ये अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह सदा सरवणकर यांना ही पराभवाचा धक्का बसला आहे. तर या मतदारसंघातून ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा दणदणीत विजय झाला आहे. माहिम विधानसभा मतदारसंघात या तिन्ही उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर होणार असंच चित्र सुरूवातीपासून होतं. मात्र मनसे आणि शिवसेनेच्या रुसव्या-फुगव्याच्या वादातून ठाकरे गटाच्या उमेदवाराने बाजू मारल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत हे पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी आधीपासून लीड कायम ठेवली. तर त्यानंतर शिवसेनेचे सदा सरवणकर हे दुसऱ्या क्रमांकावर आणि त्या खालोखाल अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर होते.
Published on: Nov 23, 2024 03:12 PM
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
