Sunil Kedar | पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान – सुनील केदार

नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस, धान आणि भाजीपाल्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदील झाले आहेत. यासंदर्भात नुकसानीची आढावा घेण्यासाठी मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.  

नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस, धान आणि भाजीपाल्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदील झाले आहेत. यासंदर्भात नुकसानीची आढावा घेण्यासाठी मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.  यात केदार यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचानामे करण्याचे आदेश दिले. उद्यापासून पीक नुकसानीचे पंचनामे सुरु होणार आहे.
राज्यपालांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर दोन दिवसीय अधिवेशनात बोलविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केलीय. यावर बोलताना केदार यांनी, एखाद्या विषयावर राज्यपाल बोलल्यानंतर त्या विषयाची माहिती न घेता मंत्र्यांनी बोलणं योग्य नाही, अशी सावध प्रतिक्रिया दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI