Manmohan Singh | सोशल मिडियावर माजी पंतप्रधानांच्या निधनाची अफवा, मनमोहन सिंह यांची प्रकृती स्थिर

सोशल मिडियावर माजी पंतप्रधानांच्या निधनाची अफवा, मनमोहन सिंह यांची प्रकृती स्थिर. एम्सच्या डॉक्टरांची माहिती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सोशल मिडियावर माजी पंतप्रधानांच्या निधनाची अफवा, मनमोहन सिंह यांची प्रकृती स्थिर. एम्सच्या डॉक्टरांची माहिती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळानंतर प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या दरम्यान अनेक नेते मनमोहन सिंग यांच्या भेटीला गेले. त्यांची विचारपूस केली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय हे देखील मनमोहन सिंगांच्या भेटीला गेले होते.

मंत्री मांडविय यांनी एम्समध्ये त्यांची भेट घेतली. तेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे छायाचित्र काढण्यात आले. हा फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला. मात्र, त्यानंतर डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांनी छायाचित्र काढल्याबद्द नाराजी व्यक्त केली आहे. मांडविया यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवायच रुग्णालयाच्या वार्डमध्ये फोटो काढल्याने सिंग यांच्या मुलीने त्यांना चांगलेच सुनावले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI