AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil | मारूतीचं दर्शन घेतलं... मीडियाशी संवाद साधला अन् अंतरवलीकडे निघाले... मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा आमरण उपोषण

Manoj Jarange Patil | मारूतीचं दर्शन घेतलं… मीडियाशी संवाद साधला अन् अंतरवलीकडे निघाले… मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा आमरण उपोषण

| Updated on: May 30, 2026 | 9:49 AM
Share

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून लेखी आश्वासन आणि अंमलबजावणीसाठी ठोस कालावधी जाहीर होईपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उपोषणापूर्वी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मारुतीरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते आंदोलनस्थळाकडे रवाना झाले असून आज सकाळी 10 वाजता ते भरउन्हात आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती मिळत आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून लेखी आश्वासन आणि अंमलबजावणीसाठी ठोस कालावधी जाहीर होईपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उपोषणापूर्वी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मारुतीरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते आंदोलनस्थळाकडे रवाना झाले असून आज सकाळी 10 वाजता ते भरउन्हात आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती मिळत आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने काल अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
या बैठकीत मराठा–कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला आणि त्यासंदर्भातील माहिती शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना दिली. मात्र, 58 लाख कुणबी नोंदी असूनही तितक्या प्रमाणात प्रमाणपत्रे का वितरित झाली नाहीत, तसेच अधिकाऱ्यांना वाटप थांबवण्याचे आदेश कोणी दिले, यावरून जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने केवळ आश्वासनांचे गुळपीठ न देता ठोस अंमलबजावणी करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

 

Published on: May 30, 2026 09:49 AM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार