Manoj Jarange : ही तर चेष्टा… मोर्चासाठी एक दिवसाची परवानगी तरीही मनोज जरांगे पाटील आक्रमक
मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांकडून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास एक दिवसाची परवनागी दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोठा ताफा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघाला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून निघालेल्या या ताफ्याला मुंबई पोलिसांकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, ही परवानगी मुंबई हायकोर्टाने नाकारली होती. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी मिळाली असली तरी जरांगे पाटील यांनी मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले असून, आमदार आणि खासदारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला आणि आंदोलनाला एक दिवसांची परवानगी दिल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका दिवसाची परवानगी म्हणजे चेष्टा असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. जाणून-बुजून एकाच दिवसाची परवानगी मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनाला दिली असंही मनोज जरांगे पाटील म्हणले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

