… अन्यथा उग्र आंदोलन करू, मराठा क्रांती मोर्चानं कशाची मागणी करत दिला इशारा?
सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर महापालिकेच्या नोकर भरतीला विरोध करण्यात येत आहे. मराठा समाजाला डावलून होत असलेली नोकर भरती रद्द करण्याची मागणी यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली. सर्वपक्षीय मराठा समाजाच्या नेत्यांचा महापालिका आयुक्तांना घेराव
सोलापूर, १३ नोव्हेंबर २०२३ | सोलापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर महापालिकेच्या नोकर भरतीला विरोध करण्यात येत आहे. मराठा समाजाला डावलून होत असलेली नोकर भरती रद्द करण्याची मागणी यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली. सर्वपक्षीय मराठा समाजाच्या नेत्यांचा महापालिका आयुक्तांना घेराव घालण्यात आला. आरक्षणाचा निर्णय शेवटच्या टप्प्यात असतानाच महापालिकेने ऐनवेळी भरती कशी काढली, असा सवालही केला आहे. मागील 40 वर्षात पहिल्यांदाच सोलापूर महापालिकेने सरळ सेवेतून भरती काढली आहे. या भरतीचा लाभ मराठा समाजाला होऊ नये अशी काही लोकांची इच्छा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे ही भरती मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थगित करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिलाय.





