Kabutar Khana : कबुतरखाना बंदी समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती रस्त्यावर अन् कार्यकर्त्यांची धरपकड, दादर परिसरात सध्या काय स्थिती?
'मराठी एकीकरण समितीने मीरारोड-भाईंदरमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला नोटीस दिली, मात्र परवा दादर येथे जो प्रकार घडला, त्यात चाकू, सुरे आणून ताडपत्र्या फाडल्याय. त्यांच्यावर काय कारवाई केली हे जाहीर करावं', असं समितीच्या कार्यकर्त्यानं म्हटलं.
मुंबईतील दादर येथील दादर कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीने आंदोलन पुकारल्याचे पाहायला मिळाले. मराठी एकीकरण समितीच्या या आंदोलनाची प्रमुख कारणे म्हणजे जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केली होती याच वक्तव्याविरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक होत त्यांनी याचा निषेध नोंदवला. यासह मराठी एकीकरण समितीने दादरमधील कबुतरखाना बंद करण्याची मागणीही यावेळी केली. या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यामुळे सध्या दादार कबुतरखाना परिसरातील तणाव वाढल्याचे दिसून येत आहे. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली असून हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. या आंदोलनादरम्यान, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बघा सध्या काय आहे दादर कबुतरखाना परिसरातील वातावरण…
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..

