पोटात लाथाबुक्क्या मारल्या, केस ओढले अन्.. ; मराठी तरुणीला परप्रांतीयाकडून मारहाण | VIDEO
एका खाजगी रुग्णालयात मराठी तरुणीला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका खाजगी रुग्णालयात मराठी तरुणीला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार 22 जुलै रोजी घडला. रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट असलेल्या या तरुणीने एका तरुणाला डॉक्टरांकडे एमआर आहे, कृपया थोडा वेळ थांबा असे सांगितले. यामुळे संतापलेल्या त्या तरुणाने तिला लाथेने मारहाण करत ढकलल्याचा प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी तरुण, गौरव झा, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. या मारहाणीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मुंबईत मराठी अमराठीचा वाद हा वाढत चाललेला असल्याने आता यावर मनसे काय भूमिका घेते ते पहाणं महत्वाचं ठरेल.

