नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
या भाषणावेळी पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेचे कौतुक केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, रामदास स्वामी, ग दी माडगुळकर, सुधीर फडके, राम गणेश गडकरी, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांसारख्या अनेक दिग्गजांची नावे घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलं. या संमेलनासाठी देश आणि विदेशातील साहित्य रसिक उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार भाषण केले. या भाषणावेळी पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेचे कौतुक केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, रामदास स्वामी, ग दी माडगुळकर, सुधीर फडके, राम गणेश गडकरी, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांसारख्या अनेक दिग्गजांची नावे घेतली. मुंबईने मराठीसह हिंदी सिनेमालाही उंचीवर नेऊन ठेवले आहे. आता तर छावाची धूम सुरू आहे. संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या साहित्यानेच करून दिला आहे. भारत जगातील सर्वात प्राचीन सभ्यतेपैकी एक आहे. आपण सात्त्याने नवीन विचार जोडून घेतले आहे. नवीन बदलाचं स्वागत केलं आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपलं साहित्य समाजाचा आरसा असतं. साहित्य समाजाचं पथप्रदर्शक असतं. त्यामुळे साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमाची देशात महत्त्वाची भूमिका असते, असेही मोदींनी म्हटले.
Published on: Feb 21, 2025 07:06 PM
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...

