विविध 12 मागण्यांसाठी पालघरमध्ये भारतीय कॅम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेने विराट मोर्चा काढला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. डहाणूमधून निघालेला मापकचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. पालघर जिल्ह्यातील जल, जमीन, आणि जंगल या ज्वलंत प्रश्नावर मार्क्सवादी पक्षाचं आंदोलन पालघरमध्ये दाखल झालं. वाढवण आणि मुरबे बंदरांचे प्रकल्प बंद करणे, अदानी उद्योग समूहाकडून बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर रद्द करणे, शेतकऱ्यांच्याबी नावावर न झालेले वनपट्टे, मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत करणे अशा विविध 12 मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला.