हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक

अजित पवार यांच्या विरोधात असलेल्या इंदापूरातील हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका बारामती लोकसभा निवडणूकीत बसू शकतो याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे.

हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक
| Updated on: Mar 29, 2024 | 1:01 PM

मुंबई : बारामतीत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेसाठी उभ्या राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडणूकीत दगाफटका होऊ नये म्हणून इंदापूरचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी करण्यात येणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आपल्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून शिवीगाळ आणि धमक्या येत असल्याची तक्रार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे आता इंदापूरातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करणे गरजेचे बनले आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दुपारी फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात दुपारी साडे तीन वाजता बैठक होणार आहे. काही दिवसांनी इंदापूरात देवेंद्र फडणवीस मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनीही जे आम्हाला विधान सभेत मदत करतील त्यांनाच आम्ही लोकसभेत मदत करु असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे.

Follow us
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.