Sharad Pawar: शरद पवार व ब्राह्मण संघटनांमध्ये बैठकीला सुरुवात, मात्र ‘या’ संघटनाही नाकारले निमंत्रण ; 20 संघटनांचे प्रतिनिधीं हजर
शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार काही संघटनांनी चर्चेचं निमंत्रण नाकारलं असलं तरी 20 ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी पवारांसोबत चर्चेसाठी उपस्थित झाले आहेत.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) हे ब्राह्मण विरोधी राजकारण करत असल्याचा आरोप सध्या होतोय. त्यातच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मधल्या काळात केलेल्या वक्तव्यांमुळेही शरद पवार यांची प्रतिमा ब्राह्मणविरोधी असल्याचं चित्र निर्माण होत आहे. सांगलीच्या(Sangali) इस्लामपुरातील सभेत आमदार अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्य असो, केतकी चितळे प्रकरणातही अमोल मिटकरी यांनी केलेलं वक्तव्य असो, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण ब्राह्मणविरोधी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशावेळी शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार काही संघटनांनी चर्चेचं निमंत्रण नाकारलं असलं तरी 20 ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी पवारांसोबत चर्चेसाठी उपस्थित झाले आहेत. यात आनंद दवे(Aanad Dave) यांच्या ब्राह्मण महासंघ आणि परशुराम संघटनेनं पवारांच्या बैठकीचं निमंत्रण नाकारलं आहे.
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....

