Mhada lottery 2022 | दिवाळीत 3 हजार म्हाडाच्या घरांची सोडत निघणार -tv9
जितेंद्र आव्हड यांची ही मोठी घोषणा म्हणजे म्हडाचं घर घेऊ पाहणाऱ्या अनेकांसाठी आनंदवार्ता आहे. अनेकजण आता पैशांची जुळजुळव करण्याचा तयारीली लागताना दिसत आहेत. कारण मुंबईत घरं घेणं आत्ता सोप राहिलेलं नाही. यंदाची दिवाळी ही अनेकांसाठी हक्काचं घर घेऊन असणारी आहे, त्यामुळे अनेकांना मुंबईत घर घेण्याचं आपलं स्पप्न पूर्ण करता येणार आहे.
मुंबई : म्हाडाकडून मुंबईकरांना मोठं दिवाळी (Diwali 2022) गिफ्ट मिळणार आहे. दिवाळीत म्हाडाच्या (Mhada Lottery) तब्बल 3 हजार घरांची सोडत निघणार आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आजच ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं अनेकाचं स्पप्न पूर्ण होणार आहे. यंदाची दिवळी ही अनेकांसाठी हक्काचं घर घेऊन येणार आहे. पहाडी गोरेगाव, मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल, असे ट्विट आजच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे आता अनेकजण या घरांच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच महाडाने उत्पादन मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे यावेळी जास्त पैसे भरण्याची तयारी मात्र ठेवाली लागणार आहे.
Published on: Jun 02, 2022 09:49 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
