Imtiaz Jaleel : संजय शिरसाटांकडे बॅग भरून पैसा? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून जलील यांचा एकच सवाल, म्हणाले….
नुकताच संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते एका बेडरुममध्ये बसलेले असून त्यांच्या बाजूला एक बॅग दिसते आहे. ही बॅग पैशांनी भरलेली असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता.
शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्याकडे बॅग भरून पैसा कुठून आला, असा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. हा आरोप एका व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या संदर्भात जलील यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट एका खोलीत बसलेले असून त्यांच्या बाजूला एक बॅग ठेवलेली दिसत आहे. ज्यात पैशांची बंडल असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याच व्हिडिओचा संदर्भ देत इम्तियाज जलील यांनीही शिरसाट यांच्याकडे बॅग भरून पैसा आला कुठून? असा सवाल केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर अनेक आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यांनी व्हिट्स हॉटेलच्या लिलाव प्रकरणाशी संबंधित आणि काही जमीन खरेदी प्रकरणात पैशांच्या स्रोतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय शिरसाट यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. व्हिट्स हॉटेलच्या लिलावातील व्यवहारांवरून जलील यांनी शिरसाटांवर संशय व्यक्त केला आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

